दिनांक आठ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास स्थानावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पल फेक व दगडफेक केली या सर्वांचा निषेध म्हणून दिनांक ९/४/२०२२ रोजी जळगाव जामोद तालुका व शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस तथा शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांच्या वतीने दुर्गा चौक ते महात्मा गांधी पुतळा नगर परिषद पर्यंत निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गा चौक येथे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीतजी पाटिल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रमेशचंद्र घोलप, काँग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर,राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष प्रकाशसेठ ढोकने,ज्येष्ठ नेते रंगराव देशमुख,युवक जिल्हा कार्याध्यक्ष पराग पाटिल अवचार, महिला तालुकाध्यक्षा वर्षाताई वाघ,शहराध्यक्ष अजहर देशमुख यांची निषेधपर भाषणे झाली. शरद पवार साहेब यांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असून महाराष्ट्र अस्थिर करून महाराष्ट्र राज्याची बदनामी करण्याचे छडयंत्र रचले जात असल्याचा घनाघात प्रसेनजीत पाटिल यांनी केला तसेच कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या घरावर हल्ला करने ही महाराष्ट्राची संस्कृती नसून काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करित असल्याचे प्रतिपादन रमेश घोलप यांनी केले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन द्वेष पसरवणाऱ्या विरोधकांना सद्बुद्धि मिळो अशी प्रार्थना युवक काँग्रेसच्या वतीने पराग अवचार यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस संदिप उगले, रमेश पाटिल, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, कार्याध्यक्ष महादेव भालतड़क, एम.डी.साबीर,डॉ. प्रशांत दाभाड़े, सविताताई देशमुख, विजय ठाकरे, सुभाष कोकाटे, संतोष देशमुख,प्रकाश गावंडे,निलेश ढोकने, महादेव वानखड़े,आशिष वायझोड़े, दत्ता डिवरे,योगेश बोराखडे,ईरफान खान, राजुसेठ पुनेवाला, तनजीर जमदार, मुहजिर मौलाना,अनूप महाले,शेख ताहेर, सुदाम गवई,रमेश हिवराळे,सुरेश पाचपोर, दादाराव धंदर,कैलास मानकर,नितीन उगले,भागवत वाघ, संजय देशमुख,डिगांबर तिजारे, विष्णु रोठे,रेहमत भाई,वासुदेव वायझोड़े, राजू भिसे, सुहास वाघ,योगेश घोपे, सिद्धू हेलोडे, सैय्यद साबीर,मोईन राज, खालिद माही,विशाल वाघ,महेश जाधव,मोहन तायडे,दिलीप देशमुख, स्वप्निल इंगळे,उदय दांडगे,सुनिल गायकी, मनिष गावंडे,निलेश पळस्कर,निखील पाथ्रीकर,गौरव पाटिल यांच्यासाह हजारो लोकांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व काँग्रेस तसेच शरद पवार प्रेमींच्या वतीने करण्यात आले मूक मोर्चा करून निषेध आंदोलन...
प्रतिनिधी/अनिल भगत.