भारतीय जनता पार्टी चा 42 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहाने साजरा...

जळगांव जा.प्रतिनिधी:-

भारतीय जनता पार्टी ची स्थापना होऊन आज 42 वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने जळगाव जामोद मतदारसंघाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी आमदार डॉ संजयजी कुटे यांनी केंद्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजना ह्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे असे मनोगत व्यक्त केले यानंतर त्यांच्या निवासस्थनी स्क्रीन लावून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे संबोधन कार्यकर्त्यांनी ऐकले. या अगोदर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भाजपा पक्षाचा झेंडा लावून मला अभिमान आहे मी भाजपचा आहे असा विश्वास व्यक्त करीत या उद्बोधन कार्यक्रमास उपस्थीत झाले. यावेळी एका युवा कार्यकर्त्यांचा केवळ सोशल मीडिया वर मुख्यमंत्री यांच्या विरोधात एक पोस्ट टाकल्यामुळे जप्त केलेला मोबाईल दीड वर्ष उलटून ही पोलीस प्रशासनाने चौकशी च्या नावा खाली अजूनही परत दिला नाही. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा ने त्याला नवीन मोबाईल भेट म्हणून दिला. यातून भाजपा हा नुसता पक्ष  नसून एक परिवार आहे हे सिद्ध होत आहे.या स्थापना दिवस च्या आयोजित कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ डॉ संजय कुटे, जिल्हा महामंत्री नंदू अग्रवाल,जि प विरोधी पक्ष नेता बंडू पाटील, माजी नगराध्यक्ष सीमा ताई डोबे, अपर्णा ताई कुटे, चंदाताई पुंडे,लताताई तायडे, सुचेताताई उमाळे,जळगाव जामोद तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, संग्रामपूर तालुका अध्यक्ष लोकेश राठी, अविनाश धर्माळ, रामदास म्हसाळ,विठ्ठल वाघ,  शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचीन देशमुख, युवा मोर्चा उपाध्यक्ष राम इंगळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष उमेश येउल,माजी नगरसेवक शैलेंद्र बोराडे, आशिष सारसार, निलेश शर्मा, रमेश कोथळकार, शरद खवणे, अरुण खिरोडकार, नाना धंदर, अंबादास शेळके, बाळू कुटे,  डॉ प्रकाश बगाडे, अप्पा, गोटू खत्ती, सखाराम ताडे, कैलास पाटील, पांडुरंग मिसाळ, सुनील रघुवंशी, अजय वंडाळे, मोहित सरप, गणेश दांडगे, करणसिंग राजपूत, अमोल भगत, रामू खोंड, अमोल ढगे, अजय धर्मे, सतीश फुसे, रितेश आव्हेकर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Previous Post Next Post