रमाई घरकुल योजनेसाठी पाच लाख निधी द्यावा..राजेंद्र गवई यांनी निवेदनाद्वारे केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी...


सागर झनके/प्रतिनिधी.

सततची वाढती महागाई लक्षात घेता रमाई घरकुल आवास योजनेच्या निधीमध्ये पाच लाखाची भरीव वाढ करावी,यासाठी राजेंद्र गवई यांनी ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मारफत  मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली.रमाई घरकुल योजनेसाठी शासनकडून एक लाख विस हजार येवढा कमी निधी घरकुल लाभार्थ्यांना मिळत असून, येवढ्या कमी निधीमध्ये आजरोजी घराचे काम होत नाही. सध्या महागाईने उचांक गाठला असून,सर्वच वस्तुचे भाव गगनाला भिडले आहे.घरकुलासाठी लागणारे,विट,रेती,लोखंड,मजुरी यामध्ये मोठी वाढ झाली असल्याने येवढ्या कमी पैशामध्ये घर बांधणे होत नाही. ऐकिकडे राज्य सरकारने सर्वच विद्यमान  आमदारांना मोफत घरे बांधून देण्याचे जाहिर केले आहे.वास्तविक सर्वच आमदारांची आथिर्क बाजू सक्षम असून त्यांना गरज नसतांनाही सरकार घरे बाधून देत आहे.तर दुसरिकडे  राज्यातील गोरगरीब जनतेला एक लाख विस हजारात घरे बांधून देण्याचा केविलवाणा प्रकार राज्य शासन करत आहे.त्यातच शहरी भागासाठी घरकुल बांधकामासाठी ज्यास्त निधी आणि ग्रामीण भागासाठी अगदीच तुटपुंजी निधी देत असून,ग्रामीण भागातील लाभार्थ्यांवर एक प्रकारे अन्यायच करत आहे. यासाठी घर बांधण्यासाठी पाच लाखाच्या निधीची तरतूद करावी.त्यासाठी घर बांधण्यासाठी पाच लाख रूपये लागत असून,त्या पाच लाखाच्या अंदाजपत्रकाची प्रतसुद्धा मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे.खरच जर राज्य शासन  गोरगरीब, कष्टकरी, भूमिहीन जनतेचे कैवारी असेल तर रमाई घरकूल योजनेसाठी जी तुटपुंजी रक्कम  दिल्या जात आहे,त्यामध्ये भरिव वाढ करून पाच लाख करण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन राजेंद्र गवई यांनी जिल्हाधिकारी यांचे मारफत  मुख्यमंत्र्यांना दिले.

Previous Post Next Post