रेल्वेचे थांबे पूर्वरत व्हावे यासाठी आंदोलन..जलंब रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस थांबवली..रेल्वे रुलावर केली निदर्शने...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-सुरज देशमुख.

मुंबई - हावडा या लोहमार्गावर असलेल्या जलंब जंक्शन वरील रेल्वेचे थांबे पूर्वरत सुरु करावे या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आजपासून विविध आंदोलनाला सुरुवात केली या मधे आज असून १० एप्रिल रोजी जलंब स्थानकावर रेलवे रोको करीत महाराष्ट्र एक्स्प्रेस थांबविण्यात आली यावेळी रेल्वे पोलीस आणि नागरिकांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र नागरिकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांच्या  विरोधाला आंदोलन जुमानले नाही ....मुंबई - हावडा या मार्गावरील शेगाव तालुक्यात येणाऱ्या जलंब जंक्शन या रेल्वे स्थानकावर एकूण नऊ गाड्यांना आतापर्यंत अधिकृतपणे थांबा होता मात्र पूर्ण काळानंतर या सर्व गाड्यांची थांबे रद्द करण्यात आल्याने रेल्वेचे थाम्बे पूर्ववत करण्यात यावे यासाठी भूमी मुक्ती मोर्चा आणि गावकऱ्यांच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती मागील तीन दिवसांपासून विविध आंदोलन केल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आज रविवारी संतप्त आंदोलनकर्त्यांनी नीलम रेल्वेस्थानकावर पोहोचून नागपुर कड़े जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी अडविण्याचा प्रयत्न केला यावेळी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस याशिवाय जलंब  पोलिसांनी चोख बंदोबस्त ठवत आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावर जाण्यासाठी मज्जाव केला मात्र आंदोलनकर्त्यांची संख्या जास्त असल्याने आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रुळावर पोहोचून निदर्शने केली यानंतर जलंब रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस पोहचल्यानंतर सदर गाडी थांबविण्यात आली. आपले आंदोलन यशस्वी झाले असून या आंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाने तात्काळ घेऊन रेल्वेचे थांबे पूर्ववत करण्यात यावे अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिला..

 

Previous Post Next Post