ज्यांचा प्रकुतीनेचं घेतला अंगठा तो कसा दिल शासनाला अंगठा,ज्यानें नाही दिला शासनाला अंगठा शासन दाखवते त्याला ,ठेंगा,


प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी,

हिवरखेड  मध्येच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात  शासनाच्या योजना राबविल्या जातात, विविध योजनांचा लाभ विविध लाभार्थी घेतात त्यासाठी लागणारे  आवश्यक कागदपत्रे सुद्धा लाभार्थी देतो परंतु ज्यावेळस वेळ येते ऑनलाइन मशिनद्वारे अंगठा ठेवण्याची  बऱ्याच लाभार्थ्यांचा अंगठा मशीनवर म्याच होतो,परंतु असे अनेक लाभार्थी आहेत ,त्यांचा हाताच्या बोटांचा अंगठा येत नाही व त्या संबंधीत अधिकारी त्यांना भुद्दडा पाडतात तुम्ही तुमचे आधार अपडेट करा, अपडेट आधार १०० रुपयात करून सुद्धा त्यां लाभार्थ्यांचा अंगठा येत नाही आणि तो लाभार्थी त्या योजनेपासून ,वंचित राहतो,  एकलव्य यांनी जसा अंगठा दिलेला आहे,तसच प्रकुतीने सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांचे अंगठे घेतले आहेत, बऱ्याच नागरिकाचा हातावर रेषा,तर घाम येतो अशा नागरिकांचा त्या मशीनवर आंगठा येत नाही , शासनाने अशा नागरिकांन करिता वेगवेगळ्या पर्याय काढायला पाहिजे किंवा हे ऑनलाइनच बंद करा असे सुद्धा सवाल हे त्रस्त लाभार्थी काढतात, बऱ्याच ठिकाणी लाभार्थ्यांचा अंगठा नाही आला तर ओ, टी, पी, किंवा म्यासेज डोळ्याद्वारे  कनेक्शन कनेक्टिव्हिट करायचे परंतु आताच्या धावपळीच्या काळात कुठलेच ऑनलाइन सेतू धारक किंवा शासकीय योजना राबविणारे अधिकारी प्रयत्न न करताच लाभार्थ्यांला सांगतात अंगठा नाही येत असेल तर तुम्हाला लाभ मिळत नाही, लाभार्थ्यांचा अंगठा येत नाही याकरीता कुठलेच लोकप्रतिनिधी सुद्धा तडजोड करत नाहीत, आणि फक्त लाभार्थ्यां जवळून मतदानाच्या दिवशी लाभार्थ्यांचा अंगठा घेतात, याबबत लाभार्थ्यांनि संताप व्यक्त केला असून शासनाने अंगठा आला पाहिजे याबाबत वेगवेगळे उपाय पर्याय काढावे अशी मागणी हिवरखेड येथिल लाभार्थ्यांना केली आहे, अंगठा मशीनवर येत नसल्याने लाभार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे गावात दिसून  आले,

Previous Post Next Post