प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.
हिवरखेड येथे दोन वर्ष सण उत्सवांवर निर्बंध आले होते पण आता सर्व जाती धर्मियांचे विविध सण उत्सव, महापुरुषांच्या जयंती उत्साहात गुण्यागोविंदाने साजरा केल्या जात आहेत. श्रीराम नवमी उत्सव आणि महात्मा ज्योतिबा फुले जयंती सुद्धा उत्साहात पार पडली, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. तर गुड फ्रायडे, श्री. हनुमान जन्मोत्सव, ईस्टर संडे लागोपाठ आहेत. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याचा उत्सव सुरू असून हिवरखेड येथील मस्जिदवर अशी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.