हिवरखेड येथे ठीक ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी,१४ एप्रिल रोजी ग्रामपंचायच्या संकुलचे डॉ बाबासाहेब आंबेडकर नामकरण,

प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.

हिवरखेड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची १३१ वि   जयंती १४ एप्रिल रोजी  साजरी करण्यात आली, गावात ठीक ठिकाणी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून जय भीम घोषणा लावण्यात आली, गावातील भिम सैनकानी सकाळी मोटरसायकल रॅली काढून जयंती साजरी करण्यात आली तर पदाधिकाऱ्यांनी ठीक ठिकाणी जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले, गावातील भिम नगर, भिम ज्योत मंडळ, इंदिरा नगर, सावता नगर, मिलींद नगर, चंद्रभणी नगर, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत  ,विविध शासकीय ठिकाणी महामानव यांची साजरी करण्यात आली, तर संध्याकाळी भिम सैनकानी  गावातून महामानवाची  शोभायात्रा काढली  समस्त उपास उपासिकांनी डॉ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर पंचशील अष्टगाता वंदना दिला,

 

Previous Post Next Post