तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची १३१ वि जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात आली, गावात ठीक ठिकाणी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून जय भीम घोषणा लावण्यात आली, गावातील भिम सैनकानी सकाळी मोटरसायकल रॅली काढून जयंती साजरी करण्यात आली तर पदाधिकाऱ्यांनी ठीक ठिकाणी जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले, गावातील त्रिरत्न बुद्ध विहार, विश्वशांती बुद्ध विहार, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत ,विविध शासकीय ठिकाणी महामानव यांची जयंती साजरी करण्यात आली, तर भीम इज किंग ग्रुप, सम्राट ग्रुप यांच्या वतीने संध्याकाळी भिम सैनकानी गावातून महामानवाची मिरवणूक काढण्यात आली. गावातील नागरिक सुमेद गवारगुरु, उपसरपंच अनिल भाकरे , प्रफुल्ल मोरे, माजी सरपंच भास्कर गवारगुरु, शेख यासीन, पोलीस पाटील बंडू गवारगुरु, समस्त उपासक उपासिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर पंचशील अष्टंगाता वंदना व अभिवादन करण्यात आले.
पंचगव्हाण येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी...
तेल्हारा विशेष प्रतिनिधी संघपाल गवारगुरु