चिखलदरा तालुक्यातील, अनेक गावात दोन महिने पासुन पाणी टंचाई पाण्या साठी राना वनात भटकंती...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

चिखलदरा पासून काही अंतरावर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या डोमा या गावातुन डॅम वरून होणारा पिण्याचा पाणी पुरवठा कोयलारी पाच डोंगरी या गावातील पाणी पुरवठा दोन महिन्या पासून खंडित झाल्याने येथील नागरिकांना पाण्या साठी वणवण भटकावे लागत आहे या ठिकाणी शासनाने करोडो रुपये खर्चून पिण्याची नवीन पाणी टाकी बांधलेली असून हे गावाला पाणी पुरवठा करणारी टाकी पांढरा हत्ती प्रमाणे गावात शोभेची वस्तू बनली आहे.गावात नळ योजना अजून ही घरो घरी पोचली नसुन मोजके ठिकाणावर काही नळ पोज स्टंड बंद अवस्थेत उभे करून ठेवलेले दिसत आहे किमान या परिसरात नागरिकांना सुख सुविधा नसल्या तरी चालतील परंतु जीवनावश्यक उपाशीपोटी स्वच्छ पाणी तरी या नागरिकांना द्यावे असा आर्थ टाहो आवाज या परिसरातील नागरिकांनी शासनाकडे केला आहे तालुक्यात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून डोंगराळ अतिदुर्गम भागातील हतरू रायपुर चुनखडी माखला माडीझडप अशा अनेक गावांत पाणी टंचाई निर्माण  झाली आहे नेहमी प्रमाणे वरिष्ठ अधिकारी या पाणीटंचाई कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे  उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात पाण्याने व्याकूळ झालेले नागरिक नदी नाले वढे या ठिकाणी पाणी भरून आपली तहान भागवत आहेत संबंधित पंचायत समिती पाणी पुरवठा अधिकारी अलिशान ऑफिसमध्ये बसून बिसलरी पाण्याने स्वतःची तहान भागवत असल्याचे बोलले जात आहे.अनेक गावात अस्वच्छ पाणी पिल्या मुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता वर्तविली जात असून त्या मुळे  आदिवासी लाहन बालकांचा गरोदर मातांचा मृत्यू देखील होत असल्याचे चिन्ह दिसत आहे शासनाचे धोरण अन्न वस्त्र निवारा स्वच्छ पाणी , असा कागदोपत्री असला तरी या वर मेळघाट मध्ये होणारा करोडो रूपये चा खर्च संबंधित यंत्रणा राबवित असलेल्या कर्मचार्‍यांच्या घशात जातो अन्न वस्त्र निवारा जरी देण्यास समर्थ शासन असलं तरी चालेल परंतु नागरिकांना स्वच्छ पाणी तरी उपाशीपोटी पिण्या साठी सरकार माय बापाने धारणी चिखलदरा कडे लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य जनते कडून चिखलदरा तालुक्यात होत आहे.अन्यथा पुढील काही दिवसात

ज्वालामुखी सारखा नागरिकांच्या मनात जनआक्रोश पाणीप्रश्न पेटल्या शिवाय राहणार नाही असे  सुर ऐकावयास मिळत आहे पंचायत समिती गटविकास अधिकारी चिखलदरा व तहसीलदार चिखलदरा यांनी, पाणी टंचाईवर लक्ष देऊन किमान

आदिवासीची ताहाण पूर्ण करावी

अशा भावना नागरिकांच्या मनात दिसून येत आहेत

Previous Post Next Post