जिद्द, धाडस, कल्पकता, प्रामाणिक प्रयत्नांसोबत सामाजिक बांधीलकी!डॉ. किशोर केला..संचालक, बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी...


 संपादकीय....
           राजेश बाठे-संपादक RC24 न्युज...

थांबला तो संपला असे म्हटले जाते ते उगीच नाही. खळाळते पाणी एका ठिकाणी साचून राहिले की त्यातली निर्मळता नाहिशी होते, तशीच गत माणसाची. असमाधान हे माणसाच्या प्रगतीचे द्वार... तृप्ती आली की तो सुस्तावतो, त्यामधील चैतन्यच हरपून जाते. याउलट सतत नव्याचा ध्यास, आशेची पलिते पेटते ठेवतो, त्याची प्रगती कधीच थांबत नाही. डॉ. किशोर किसनलालजी केला यांनी हे सूत्र फार पूर्वीच ओळखले, म्हणूनच आज ते सर्वच क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून उभे आहेत. वैद्यकीय क्षेत्रापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राजकारण, समाजकारण, शेती, सहकार, शिक्षण, पणन, बांधकाम अशा विविध क्षेत्रात ठसा उमटविणारा ठरला आहे. जिद्द, धाडस, कल्पकता, अत्याधुनिकता, तंत्रज्ञानाची कास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातीशी अन् मातीमधील माणसांशी कायम ठेवलेला ऋणानुबंध ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे.बुलडाण्याच्या जळगाव जामोदसारख्या आडवळणाच्या गावातील केला कुटुंब, पाच भाऊ, दोन बहिणी, वडील किसनलालजी यांनी सर्व मुलांना व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य देतानाच सामाजिक बांधीलकीचा संस्कार तसेच कष्ट व परिश्रमाला पर्याय नसतो, हा मूलमंत्र दिला. तो सर्व मुलांनी आजतागायत जपला असल्याने 'केला' कुटुंबाची सर्वच क्षेत्रात आज देदीप्यमान अशी झेप दिसून येते. डॉ. किशोर केला यांचा उत्कर्ष त्यांचे प्रत्यंतर देते. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बीएएमएसची पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ. केला यांनी वैद्यकीय सेवेसाठी जळगाव जामोद हे आपले गावच निवडले. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल जळगाव जामोद परिसरात चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प 'जनक हॉस्पिटल' मधून साकार झाला. तज्ज्ञ डॉक्टारांची सेवा, आरोग्य शिबिरे या माध्यमातून डॉ. केला यांची या परिसराला नवी ओळख निर्माण झाली. जायंट्स महिला वसतिगृह व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमाने असहाय मुलींना आधार दिला. मुंबई येथील वेश्यागृहातून सोडविलेल्या तरुणींचे विवाह व पुनर्वसन, व्यसनमुक्ती, एड्सविरोधी जनजागृती, गुजरातमधील भूंकपग्रस्तांच्या मदतीसाठी निधी, अशा अनेक उपक्रमांमधून डॉ. किशोर केला यांची व्यस्तता होती. एकीकडे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात नाव होत असतानाच दुसरीकडे वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांचे लक्ष होतेच, त्यांनी हळदीचे एकरी ७० क्विंटल उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला. कापूस, ऊस, हळद, केळी, सागवान यासोबतच वनौषधींचे उत्पादन घेतानाच त्यांनी शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने प्रगतिशील कास्तकार अशीही त्यांची ओळखच निर्माण झाली नाही, तर थेट दूरदर्शनने त्यांच्या कामाची दखल घेतली. विविध पुरस्कार त्यांना मिळाले. शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायही वृद्धिंगत झाला पाहिजे, यासाठी त्यांनी केंद्र सरकार पुरस्कृत टीएमसी अंतर्गत सुपो जिनिंग फॅक्टरी सुरू केली. असा सारा यशस्वी प्रवास सुरू असतानाच सामाजिक बांधीलकी त्यांनी कधीच सोडली नाही. त्यांची ही धडपड पाहून बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चाडक उपाख्य भाईजी यांनी त्यांना बुलडाणा अर्बनचे संचालक केले अन् डॉ. किशोर केला यांच्या कल्पकतेला मोठे व्यासपीठ मिळाले. बुलडाणा अर्बनचा विस्तार करण्यासाठी त्यांनी भाईजींच्या मार्गदर्शनाखाली मोठी कामगिरी केली. बुलडाणा अर्बन व बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या माध्यमातून विविध सामाजिक काम उभे करतानाच त्यांनी सहकार विद्या मंदिर या इंग्रजी माध्यमांच्या शाळाची मोठी शृंखला जळगाव जामोद परिसरात उभी केली. जळगावचे केला व छोरिया, वरवट बकालचे सहकार विद्यामंदिर हे त्यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे, अत्याधुनिक साहित्यांची उपलब्धता, उत्तम शिक्षण, निर्मळ शैक्षणिक वातावरण व माफक शुल्क या चतु:सूत्रीवर त्यांनी उभारलेले शैक्षणिक विश्व हे आदर्शवत ठरले आहे. बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध

Previous Post Next Post