शेगाव येथे एमटीडीसी येथे अनधिकृत रित्या मेळा बाजारामध्ये दिनांक 13 एप्रिल रोजीच्या मुलीच्या छेडखानी प्रकाराने स्थानिक नागरिक व आयोजकांन मध्ये वाद झाल्याने छेडखानी बद्दल जाब विचारला असता वाद वाढतच गेला. सदर वाद दोन्ही समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या मध्यस्थीने मिटविण्यात आला असता,शेगाव येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना चुकीची माहिती दिल्याने सदर प्रकरण वाढवून हेतूपुरस्पर सूडबुद्धीने निष्पाप नागरिकांवर 353 सारखे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच कारवाईच्या विरोधात दिनांक 11 एप्रिल रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत विश्व हिंदू परिषद बजरंग दल भाजपा या सारख्या विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या कारवाईच्या विरोधात तीव्र निदर्शने करीत निषेध नोंदवून या निष्पाप नागरिकांवरील गुन्हे ताबडतोब बरखास्त करण्यात यावे तसेच दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसे न केल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल भाजपा व हिंदुत्ववादी संघटना टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलने करतील व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी बजरंग दल चे नंदकिशोर दलाल, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, माजी नगराध्यक्ष सीमाताई डोबे,सौ.शिल्पा भगत, शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, उद्धव सातव, ज्ञानेश्वर कराळे,नीलेश शर्मा, सुनगावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, अमोल भगत, मंगेश तेलंगडे, अजय वंडाळे,अंबादास निंबाळकर,सचिन कपले,वैभव अढाव,उमेश येऊल,पवन पाटील,राम इंगळे,चंद्रकांत वाघ यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दल व भारतीय जनता पार्टी जळगाव जामोद तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेगाव येथील युवकांवर सूडबुद्धीने दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या बजरंग दलाची मागणी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-