विसावा वृध्दाश्रमात विसावले पंजाबराव मोंढे..वृध्दाश्रमातच घेतला जगाचा निरोप...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

सरणावर कळले होते...मरणाने केली सुटका...जगण्याने छळले होते... असाच काहीसा प्रसंग सोमवार दि.18 एप्रिल रोजी अचलपूर तालुक्यातील विसावा वृध्दाश्रमात पहावयास मिळाला. विसावा वृध्दाश्रमातील निवासरत घरच्यांनी साथ सोडलेल्या पंजाबराव मोंढे यांचे 18 एप्रिलला सकाळी 8.30 वा.विसावा वृध्दाश्रमातच निधन झाले. मृत्युसमयी रक्ताचे नाही तर मनाचे नाते जुळलेले इतर वृध्दच त्यांच्या सोबत होते.सापन बहुददेशिय संस्थेच्या वतीने चांदुर बाजार-अचलपुर रोड वर शेकापुर जवर्डी परिसरात विसावा वृध्दाश्रम चालविल्या जाते. जवळच्यांनी आयुष्याच्या संध्याकाळी नाते तोडुन बाहेरचा रस्ता दाखविलेल्या निराधार वृध्दांची चांगल्याप्रकार सुश्रुषा वृध्दाश्रमाचे संस्थापक सचिव अॅड.भाष्कर कौतिक्कर, अध्यक्ष पुंडलीकराव भुजाडे, व्यवस्थापक सचिन गणेशराव वानखडे व कर्मचा·यांकडुन करण्यात येते. अशाच प्रकारे कुटुंबापासुन दुरावलेले पंजाबराव मोंढे हे जवळपास 7 वर्षापुर्वी विसावा वृध्दाश्रमात दाखल झाले. इतर वृध्दांपेक्षा वयाने लहान असल्याने इतर सर्व जेष्ठ महिला व पुरुष वृध्दांना ते नेहमीच कामात मदत करीत होते. वृध्दाश्रमातील एका वृध्द म्हातारीचे जेव्हा वर्धा येथील सावंगी मेघे रुग्णालयात पाठीचे ऑपरेशन होते तेव्हा त्या म्हातारीची आजारपणात अतिशय चांगली सेवा पंजाबरावांनी केली होती. असे पंजाबराव मोंढे जेव्हा मागील 8 दिवसांपासुन आजारपणामुळे अंथरुणाला खिळले तेव्हा त्याच म्हातारीने देखील उपकाराची परतफेड म्हणुन मोंढे यांची शेवटच्या काळात सेवा केली. शेवटी सोमवार 18 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वा.पंजाबराव यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या जाणाने विसावा वृध्दाश्रमात दुखाची लाट पसरली होती. पंजाबरावांच्या जाण्याने दुखी झालेल्या विसावा वृध्दाश्रमातील वृध्दांनी अंतविधी होईपर्यंत जेवण सुध्दा केले नाही. पंजाबरावांना विसावा वृध्दाश्रम परिसरातच दाहअग्नी देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विसावा वृध्दाश्रमातील वृध्दाचे निधन झाल्याची माहिती वृध्दाश्रमाला भेट देणारे परतवाडा येथील सामाजीक सदभावना मंचचे अध्यक्ष, बालरोगतज्ञ डॉ.राम ठाकरे व शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष ठाकुर श्यामसिंह गड्रेल यांना होताच त्यांनी  अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी मदत केली. यावेळी विसावा वृध्दाश्रमाचे संस्थापक सचिव अॅड.भाष्कर कौतिक्कर, अध्यक्ष पुंडलिकराव भुजाडे, व्यवस्थापक सचिन गणेशराव वानखडे, जानरावजी कौतिक्कर, दै.विदर्भ मतदारचे नयन मोंढे, माहेर फाऊंडेशनच्या अध्यक्षा दिपाताई तायडे, सामाजीक कार्यकर्ते अक्षय माकोडे, शांतनु घोम यांच्यासह मोंढे परिवारातील सदस्यांची उपस्थीती होती.

Previous Post Next Post