तेल्हारा विशेष प्रतिनिधी:- संघपाल गवारगुरु
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड महावितरण कंपनीचा कारभार नियोजन शून्य असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा सुरळीतपणे मिळत नसल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांची पिके संकटात आली, खंडाळा फिटर हे वारंवार बंदच राहते दिवसभरातून एक तास फिटर सुरू राहते त्यामुळे शेतातील पिकाना बोरवेलचे पाणी मिळत नाही, शेतकऱ्यांची पिके महागडी असून शेतकऱ्यांनि त्यांच्या पिकांवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले, त्यांची पिके बहरण्याची वेळ आली ज्यावेळे पाणी देण्याची वेळ आली त्याच वेळेस शेतातील खंडाळा फिटर बंद राहतो त्यामुळे पाणी मिळत नाही ,अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होणार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयाकडे तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांची समस्या सोडवावी अन्यथा शेतकरी विविध प्रकारचे आंदोलने करतील,