06 एप्रिल 2022 रोजी भाजपाचा स्थापना दिवस सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने दिना11 एप्रिल रोजी मेळघाटच्या जनतेने विविध समस्यांना सोडवण्यासाठी भव्य जन आक्रोश मोर्चा धारणी शहराच्या A.P.M.C. मैदानापासून उपविभागीय कार्यालय पर्यंत भाजपाचे ता. अध्यक्ष श्री. हिरालालजी मावस्कर तसेच माजी आमदार श्री. प्रभूदासजी भिलावेकर, माजी आयुक्त श्री. रमेशजी मावस्कर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. वीज पुरवठा 10 ते 12 तास कटौतीमुळे शेतकर्यांचे मुंगची फसल पुर्णपणे नष्ट होत आहे. तसेच प्रत्येक गावात वीज कापणी आणि पाण्याची पातळी खाली गेल्याने पिण्याच्या पाण्याची किल्लत होत आहे. अश्या विविध समस्यांना सोडवण्यासाठी भाजपाचे शिष्ट मंडळाने उपविभागीय कार्यालय पर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्यात आला या मोर्चा मध्ये हजारोंच्या संख्येने महिला व शेतकरी बंधु उपस्थित होते.भव्य जन आक्रोश मोर्च्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. सुभाषजी गुप्ता, श्री. नालमवारजी, महामंत्री श्री. सुनिल लखपती, ज्येष्ठ नेते श्री. सदाशिवजी खडके, श्री. सुधाकरजी फकडे, श्री. लक्ष्मण जांबेकर, एड. संतोषजी कलमेकर, श्री. धोंडीबा मुंडे, सुशिल गुप्ता, नगरसेविका सौ. संगिताताई खार्वे, सौ. सोनकली दारसिंबे, ता. सचिव मनिषकुमारजी पांडेय, श्री. अनुज पांडेय, श्री. अंबर बन्सोड, जि. महामंत्री श्री. साबुलाल दहिकर, पं.स. सदस्य रामविलासजि दहिकर तसेच सर्व भाजपा कार्यकर्ता उपस्थितीत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मेळघाट भाजपाच्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चा...
धारणी तालुका प्रतींनिधी :- सुंदर पोटेकर.