चिखलदरा येथे आयटीआय प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..

स्थानिक औधोगिक प्रशिक्षण संस्थेत फिटर या व्यवसायात शिक्षण घेणाऱ्या मोर्शी तालुक्यातील उदखेड येथिल विद्यार्थ्यांने गुरुवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास गिरीस्थान काॅलनीतील भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. चेतन देविदास पवार (20 रा. उदखेड) असे मृतांचे नाव आहे. गुरुवारी यश सुभाष सोळंके रा. मुर्तीजापूर हा त्यांचा मित्र कामानिमित्त बाहेर गेला होता. परत आला तेव्हा चेतनने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यशने पोलिसांना माहिती दिली. चिखलदरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला या घटनेने औधोगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनामधे खळबळ उडाली आहे.

Previous Post Next Post