अंगावर भिंत पडल्याने सहा वर्षे चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या उसरा येथे दिनांक 21 एप्रिल रोजी जोराच्या वादळामुळे घराच्या अंगणामध्ये खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीच्या अंगावर हवेमुळे भिंत कोसळली असता त्यामध्ये चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उसरा येथील सोनाक्षी रमेश वानखडे वय वर्ष सहा असे मृत झालेल्या चिमुरडीचे नाव असून तिचे आई-वडील कामानिमित्त शेतात गेली असताना ती आपल्या मोठ्या भावंडांसोबत घरी खेळत असताना जोराचा वादळ वारा सुटल्याने तिच्या घराची भिंत अंगावर पडली व त्यामुळे ती गंभीर जखमी झाली असता तिचे मामा आनंदा आगरकर यांनी सोनाक्षीला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण उसरा गावावर शोककळा पसरली आहे.

Previous Post Next Post