अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित...... हे तर शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम..शेतकर्‍यांकडून शासनाला गाजर भेट .....!


जळगाव जा प्रतिनिधी:- 

यावर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे सप्टेंबर_आक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला अतिशय मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली होती.त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव जामोद तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले ज्वारी, मका, बाजरी, उडिद, मुंग , सोयाबीन आदी काही पिके जमीनदोस्त झालेली होती.नदिकाठच्या व पाण्याच्या प्रवाहात असलेल्या जमिनी ह्या पिकांसह खरडुंन गेलेल्या होत्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याकरीत प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकाचे पंचनामे सुद्धा करण्यात आले होते. सरकारचे लक्ष वेधावे या करीता शेतकर्‍यांच्या वतीने निवेदने सुद्धा देण्यात आली होती.परंतु ६-७ महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत कोणत्याच प्रकारची मदत जमा झालेली दिसत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे आर्थिक मदत न करता शासन केवळ शेतकऱ्यांना गाजर देण्याचे काम करते का.? असा प्रश्न शेतकरी वर्गामध्ये निर्माण झालेला आहे.त्यामुळे आज शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार साहेब यांच्यामार्फत शासनाला गाजरं पाठवुन देण्यात आले.

Previous Post Next Post