राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा तसेच देशाचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या सिल्वरओक या निवासस्थानावर काही एसटी कर्मचाऱ्यांनी दिनांक आठ एप्रिल रोजी दगडफेक व चपला फेक करून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला आहे हा सर्व प्रकार राजकीय खेळी असून यामागील मास्टर माईंड शोधून त्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात यावी.शरदचंद्रजी पवार  हे भारतीय राजकारणातील द्रष्टे नेते असून त्यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्रातील विविध पक्षांमध्ये धडकी भरलेली आहे. मागील काही महिन्यांपासून राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांनी एसटीचा कर्मचारी विलीनीकरणासाठी संप ठेवून गेल्या पाच महिन्यापासून जनतेला नाहक त्रास देण्यात कोणतीही कसूर केलेली नाही त्यामुळे हा हल्ला सूडबुद्धीने केला गेला आहे त्याचा जळगाव जामोद तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील ,प्रमोद सपकाळ तालुकाध्यक्ष,अड. संदीप उगले, शहराध्यक्ष अझहर देशमुख,कार्याध्यक्ष महादेव भालतडक, इरफान खान, योगेश घोपे, आशिष वायझोडे,adv. मोहसीन खान,adv. करीम खान, योगेश कुंवर, दत्ता डीवरे, तंजिर जमादार, सिद्धार्थ हेलोडे,सतीश तायडे, शेख नावेद.. व इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post