हनुमान जयंती दिनी जळगाव जामोद शहरातील मानाजी चौकातील काळा मारुती येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 16 एप्रिल रोजी सात वाजेच्या दरम्यान श्री हनुमान चालीसा व महाआरती चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्वप्रथम श्री हनुमंताच्या मूर्तीला जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच यावेळी काळा मारुती येथील मंदिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसीची जळगाव जामोद शहराध्यक्ष नागेश भटकर यांच्या नेतृत्वात मंदिरामध्ये हनुमान चालीसा व महाआरती चा कार्यक्रम संपन्न झाला तसेच या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष यांच्या हस्ते मोठ्या उत्साहाने हनुमानाची आरती व हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक बाळू पाटील, शहर उपाध्यक्ष गोपाल वानखडे, शहर संघटक वैभव येनकर, सागर अग्रवाल, कृणाल तायडे, आनंद सपकाळ, योगेश म्हसाळ, गोपाल ताडे ,जगदेव डांगे,दिनेश वसतकार, गणेश कतोरे,मंगेश वानखडे, राहुल बावणे, शाम गिर्हे, शाम तायडे, अक्षय मानकर, रोहित वानखडे त्यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान जयंतीदिनी महाआरती व हनुमान चालीसा पठण...
जळगांव जा.प्रतिनिधी:-