गेल्या दोन अडीच वर्षापासून या राज्यातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आली आहे. आर्थिक घोटाळे करणारे लोक जिकडेतिकडे सक्रिय झाले असून त्यांना राजाश्रय मिळत आहे. सर्वत्र रोजगार हरवला आहे गोरगरीब जनतेच्या हाताला काम नाही.कोरोनाने आगोदरच रोजगार हरवला आहे. मिळेल त्या रोजगारातून उदरनिर्वाह सुरू आहे. ह्यातून चार पैसे मिळतील काय? त्यातून रोजगार मिळेल का? याची चिंता राज्यातील बचत गटातील महिला सदस्यांना असते. त्यातच एका राजकीय पक्षाच्या रॅकेटच्या माध्यमातून महिला बचत गट सदस्यांना शर्ट चे बटन बनवून देण्याच्या मशीन आणि मसाला पॅकिंग मशीन अव्वाच्या सव्वा किमती माथी मारून जळगांव-संग्रामपूर तालुक्यात सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये रोख स्वरूपात व फोन पे च्या माध्यमातून हडपणाऱ्या राधाकृष्ण सेल्स कार्पोरेशन आणि आर के सेल्स कार्पोरेशन पुणे व त्यांचे खुशाली पुरूषोत्तम निमकर्डे, पुरुषोत्तम रघुनाथ निमकर्डे हे विकास अधिकारी व अजित हिवरे सारखे भागीदार यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करून हा हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या आणि आर्थिक लोभाला बळी पडलेल्या महिला गट बचत गट सदस्यांना त्यांचे हडप केलेले पैसे परत करावे,दोन तालुक्यातील महिलांना महिलांना दोन ते अडीच कोटी नाही तर संपूर्ण राज्यात तीनशे कोटी रुपयापर्यंत फसवणूक ह्या कंपनीने केली आहे.बचत गटाच्या होतकरू,श्रमिक महिलांचे पैसे परत करावे अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल"' असा इशारा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिला आहे. दिनांक १८ मार्च रोजीस्थानिक पोलिस ठाण्यात पिळवणूक झालेल्या महिलांचे ग्रहाने ऐकून घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
--------------------------------
सौ.खुशाली आणि पुरुषोत्तम निमकर्डे शिवाजीनगर आडगाव व अजित हिवरे यांच्या माध्यमातून आर के सेल्स ह्या सातारा येथील कंपनी चे पुण्याला मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात,व गावात त्याचे विकास अधिकारी व गटप्रवर्तक आहेत. अकोला येथील एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेले विकास अधिकारी संगीता चव्हाण ह्या पोलीस कारवाईदरम्यान अटकेत असून १३२कोटी रुपयांनी महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी अकोल्याच्या खदान पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एका विशिष्ट पक्षाने पक्षाची संपूर्ण यंत्रणा वापरून बचत गटांच्या लाखो महिलांची फसवणूक केली आहे. ते महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता लगतच्या मध्य प्रदेशातील शहापूर शहरात सुद्धा महाराष्ट्रातल्या निकटवर्तीय नातरवाईकांच्या माध्यमातून येथील बचत गटांच्या महिलांची फसवणूक केली असून आपण याविषयी शहापूरच्या ठाणेदाराची सुद्धा बोललो असल्याचे आमदार संजय कुटे यांनी यावेळी सांगितले. कोणत्या पक्षाचा नेटवर्क कामला लागलेले आहे,याच्या बातम्या अकोल्यातील सर्वत्र वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत, ते वेगळे सांगायची गरज नाही आणि ज्या महिलांची फसवणूक झाली, पिळवणूक झाली त्यांनासुद्धा कोणाच्या माध्यमातून आपण फसलेलो आहोत, कोणते राजकीय पक्ष यात गुंतलेले आहेत याची सर्वच जाण आहे. एक एक रुपया करून ह्या महिलांनी पैसे गोळा करून संबंधित कंपनीला दिले. कोणी दागिने विकून दिले, कोणी पोथ विकून दिले तर कोणी घरदार गहाण ठेवून दिले. आता ह्या महिला गावातील जी केंद्रप्रमुख महिला आहे.तिच्याकवर दबाव टाकून आपल्या पैशांची मागणी करीत आहेत.
------------------------------------
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न: राधाकृष्ण सेल, आर के सेल्स ह्या कंपनीने गावागावात त्यांच्या गटप्रवर्तक नेमल्या. त्यांच्या माध्यमातून गावातील महिलांकडून पैसे गोळा केले. ह्या गटप्रवर्तक महिलांना प्रोत्साहनपर आर्थिक लाभ दिला. या महिलांनी गावातील इतर महिलांकडून बटन मशीन साठी व मसाला पॅकिंग मशीन साठी पैसे गोळा केले. कच्चामाल पुरउन संपूर्ण पक्का माल विकत घेण्याची हमी दिली. आता कच्चामाल सुद्धा त्यांनी घेतला नाही व मशीन साठी घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात कित्येक महिलांना अद्याप पर्यंत मशीन सुद्धा दिली नाही. ते पैसे निमकर्डे दाम्पत्याला दिले. निमकर्डे दाम्पत्यांनी ते पैसे रोख स्वरूपात हिवरे यांच्याकडे पुण्याला पोहोच केले तर काही पैसे फोन पे द्वारे कंपनीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले. सोनगाव आणि जामोद परिसरातील महिलांना ते पैसे गावातील गटप्रवर्तक महिलेकडे दिले.आता ज्या ज्या महिलांनी हे पैसे गटप्रवर्तक महिलेकडे दिले त्यात त्या प्रवर्तक महिलेकडे गावातील सर्व महिला जात आहेत. त्यांना आपले पैसे परत मागत आहेत, न दिल्यास त्यांच्याशी भांडण-तंटे सुद्धा करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीतीसुद्धा आहे. अशाच एका प्रकरणात जिल्ह्यातील पिंपळगाव राजा माहेर असलेली महिला मध्य प्रदेशातील शहापूरला वास्तव्यास आहे. तिने तिथे गावातील महिलांकडून पैसे गोळा करून ह्या कंपनीला दिले आहेत, परंतु आज या महिलेने पर्यंत बचत गटातील ज्या महिला सदस्यांनी या महिलेकडे पैसे दिले त्या गावातील सर्व महिला ह्या गटप्रवर्तक महिलेला वेठीस धरत आहेत व त्यांच्या पैशाची मागणी करत आहेत. सदर प्रकरण शहापूर पोलीस स्टेशन पर्यंत सुद्धा गेले असून आमदार संजय कुटे यांनी शहापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदारांसोबत सुद्धा याविषयी बोलणी करून ह्या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले.
-----------------------------
हा घोटाळा साधा नसून जळगाव संग्रामपूर तालुक्यातील महिलांचीच ओडिसा ते तीन कोटी रुपयांनी फसवणूक झाली असून संपूर्ण राज्यात अडीचशे ते तीनशेकोटीपेक्षा अधिक रुपयांनी लाखो महिलांना फसवले गेले आहे. या प्रकरणी आपण लवकरच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या कानी हा सर्व प्रकार घालणार आहोत. येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात सुद्धा या प्रकरणाकडे आपण लक्ष वेधणार आहोत असून फसवणूक झालेल्या महिलांना आपण वार्यावर सोडणार नसून संबंधित कंपनीने त्यांचे हडप केलेले पैसे मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. गावातील ज्या महिलांनी मुख्य महिलेकडे पैसे गोळा केले त्या महिलांनी संबंधित महिलांची भांडण न करता थोडा संयम बाळगावा. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेऊन तपासकार्यात पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले आहे. सदर पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बंडू पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, माजी नगरसेवक निलेश शर्मा, सुनगाव येथील सरपंच रामेश्वर अंबडकार, पंकज देशमुख यांची या पत्रकार परिषदेला उपस्थित होती....