प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड ओंम शांती जवळील रहिवासी एस टी बस वाहक वासुदेव भड हे त्यांच्या शेतात सकाळी जात असतांना त्यांच्या खिशातून त्याचा महागळा मोबाईल पडला पण त्यांना मोबाईल पडला याची जाण नव्हती ते दुपारी घरी आल्यावर त्यांना मोबाईलची आठवण आली त्यांनी मोबाईलची आशा सौडुन दिली ,परंतु ते म्हणतात चांगले कर्म कराल, चांगले फळ मिळेल, तशीच ही बाब तो रस्त्यावर पडलेला मोबाईल दानापूर येथील अमोल ढगे यांना दिसला त्यानि व्यवस्थित सांभाळ करून मोबाईल वरील नंबर द्वारे कॉलकरून तो मोबाईल भड यांचे नातेवाईक मनिष भड यांच्या स्वाधीन करून वासुदेव भड यांच्या पर्यत पोहचवला ज्यांचा मोबाईल त्यांना संध्याकाळ पर्यत परत दिला, यावरून माणुसकी अजून जिवंत आहे हे समजते, हागे यांनी या जमान्यात महागडा मोबाईल परत करून माणुसकीचा परिचय दिला,
