जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम गाडेगांव येथील सरपंच रमेश नाईक यांचे मोठे बंधु नानाराव सखाराम नाईक वय ५० वर्ष यांचा दिनांक ७ एप्रिल रोजी पाण्याची मोटार चालू करण्यासाठी पिन लावण्यासाठी गेले असता त्यांना जोरात इलेक्ट्रिक चा धक्का लागला व त्यांना उपचारासाठी नांदुरा येथील डॉ बढे यांच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी नानाराव नाईक यांना मृत घोषित केले. त्यानंतर नानाराव नाईक यांचा मृतदेह नाईक कुटुंबाने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात हलविला असता सदर घटनेची फिर्याद जळगांव जामोद येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर तर्फे सुरक्षारक्षक यांनी जळगांव पोलीस स्टेशनला दिली असता.पोलिसांनी धाव घेतली व प्राथमिक माहिती घेऊन मर्ग दाखल करण्यात आला व जळगांव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सदर मृतक नानाराव नाईक यांना पत्नी दोन मुले,आई,वडील,भाऊ असा बराच मोठा आप्त परीवार आहे.सदर घटनेचा तपास जळगांव पोलिस स्टेशनचे अतुल मोहाळे करीत आहेत.
गाडेगांव बु।येथील सरपंच रमेश नाईक यांचे मोठे भाऊ नानाराव नाईक यांचा इलेक्ट्रिक शॉक लागुन दुर्दैवी मृत्यू...
जळगांव जा.प्रतिनिधी:-