जलंब गेल्या 2 वर्षांपासून कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे जलंब जंक्शन रेल्वे रटेशनवर थांबत असलेल्या सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला होता त्यामुळे सदर सर्व थांबे पूर्ववत सुरु करण्यासाठी येथील सव॔ पक्षीय व ग्रामस्थांच्या वतीने आज दि.8 एप्रिल पासून धरणे आंदोलनसुरू केले आहे.जलंब जंक्शन रेल्वे रटेशन हे विदर्भातील इंग्रज काळापासून पहिले रेल्वे रटेशन असुन सदर रेल्वे रटेशनवर सर्वच मेल एक्सप्रेस गाड्यांचा थांबा होता परंतु रेल्वे प्रशासनाने कोवीड 19 मुळे दि.23 मार्च पासून जवळपास दोन वर्षांपासून सर्व गाड्यांचे थांबे बंद केले होते. त्यामुळेग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांचे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून प्रचंड हाल झाले आहेत.तसेच सदर जलंब रेल्वे रटेशनवर गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन व लोक प्रतिनिधींना वारंवार लेखी तक्रार करून सुध्दा सदर मागणी कडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर ना इलाजाने सर्व पक्षीय व ग्रामस्थांनी धरणे आंदोलन सुरू केले आहेत.सदर आंदोलनामध्ये बहुसंख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. तसेच यावेळी धरणे आंदोलनामध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
जलंब रेल्वे रटेशनवर कोवीडमुळे बंद झालेल्या रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करण्यासाठी धरणे आंदोलन सुरू....
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख