महिला गृह उद्योग शाखाप्रमुख महिलांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्यात नमूद केले की सौ. खुशाली उर्फ चेतना पुरूषोत्तम निमकर्डे व पुरूषोत्तम रघुनाथ निमकर्डे हे दोघेही राहणार अडगांव ता. अकोट जि. अकोला, डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर राधाकृष्ण सेल्स कार्पोरेशन या महिला स्वयंरोजगार या कंपनीच्या माध्यमातुन निमकर्डे दाम्पत्या हयांनी स्वयंरोजगार या विषयी माहीती दिली. त्यानंतर गावातील महिलांची मिटींग घेण्यास सांगितले. त्या अनुषंगाने त्यांनी जळगांव व जामोद येथील मिटींगला सौ. खुशालीताई निमकर्डे यांनी मार्गदर्शन केले. स्वयंरोजगारासाठी प्रत्येक गावात शाखा उघडण्याचे सांगितले आणि सौ. खुशाली निमकर्डे यांनी कंपनीचे स्वयंरोजगाराच्या नावावर तालुका स्तरावर एक स्टॉक एजंट आणि त्या एजंट मार्फत प्रत्येक गावात एक शाखा स्थापन करून त्याव्दारे महिला जोडण्यास सांगितले. प्रत्येक मशिनची किंमत रू.११०००/ घेण्यास सांगितले व त्या सोबत महिलांना कच्चा माल व कापड पुरविल्या जाईजल असे सांगितले. प्रतीबटन ४० पैसे मजुरी अशा स्वरूपात ५०० बटन केल्यास २०० रू. मजुरी मिळेल आणि त्या महिलेने ३ महिला जोडल्या तर तिला २ रू. बटना प्रमाणे ४०० रू. रोज मिळेल असे आश्वासन दिले व या सोबतच मसाला पॅकींग मशिन रू.१५,०००/- या "सोबत खुला मसाला पुरविल्या जाईल असे आश्वासन दिले.या व्दारे महिन्याकाठी ६०००/- रु. रोजगार प्राप्त होईल असे सांगितले. त्या आश्वासना पोटी प्रत्येक गावातुन शाखा प्रमुख हयांनी महिला गृहउद्योगासाठी ११,०००/- रू. प्रती महिला या प्रमाणे महिला जोडल्या. मशिनचे प्रत्येकी ११,०००/-रू. सौ. खुशाली निमकर्डे व पुरूषोत्तम निमकर्डे यांच्याकडे पाठविले. .पहिले काही दिवस सुरळीत माल देवुन नंतर कच्चा माल पुरविला नाही व महिलांचे मजुरीचे सुध्दा दिले नाहीत. कारणे विचारली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत व स्वतः कडची जबाबदारी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित हिरवे यांच्याकडे सोपविली. यांच्याशी सुध्दा संपर्क केला असता त्यांनी सुध्दा उडवाउडवीची उत्तरे दिलीत अशा प्रकारे संगनमताने वरील तिनही जणांनी महिलांची फसवणुक केली.तसेच जळगांव जामोद, संग्रामपुर, नांदुरा, या सर्व शाखांनी मिळुन सदर प्रकरणाची फिर्याद प्रत्येक पोलीस ठाण्यात दिलेली आहे. याबाबत सखोल चौकशी करून फसवणूक करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.या निवेदनावर सुरेखा अनिल भड. शारदा गजानन वानखडे. रिता बंडु कळस्कार,प्रीती महादेव इंगळे, इत्यादीच्या निवेदणावर सह्या आहेत.
महिला गृहउद्योगाच्या नावावर झालेल्या फसवणुकीच्या चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन..
जळगांव जा.प्रतिनिधी:-