जळगांव जा.प्रतिनिधी:-
सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या जळगाव जामोद तालुका युवा अध्यक्ष पदी जळगाव जामोद येथील शिंपी समाजातील युवा कार्यकर्ते खंबीर दृढनिश्चयी असे अजय राजेश देवगिरीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी परिषदेचे विदर्भ अध्यक्ष राजेश लहासे यांच्या पत्राद्वारे ही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या या नियुक्तीने जळगाव जामोद तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे त्यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील विद्यार्थी बेरोजगार व इतर गरजू लोकांना यांचा खूप मोठा फायदा मिळणार आहे. ओबीसी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या शासन दरबारी पोहोचवून न्याय मिळवून देऊ शकेल असे नेतृत्व अजय देवगिरीकर यांचे आहे.
