स्थानिय अकोट येथे जागतीक वसुंधरा दिना निमित्य 22 एप्रिल शुक्रवार रोजी महाराष्ट्र नवक्रांती शिक्षण व पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य अकोट याच्या द्वारे पर्यावरण स्नेही,स्वच्छता दुत,आरोग्य दुत, लोकहितपयोगी सामाजिक कार्याबद्दल तसेच शैक्षणिक कार्य संघटक या पुरस्काराने अकोला येथील SP मा.श्री.जी.श्रीधर साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते *आपल गाव लय भारी चित्रपटाचे निर्माता श्री. आशिष भटकर* यांना सन्मानित करुन सन्मानपत्र देण्यात आले.तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.जी श्रीधर साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच प्रशासन अधिकारी जि.प.अकोला श्री.राजेश खुमकर साहेब ,नायब तहसिलदार श्री.हरीष गुरव साहेब,सौ. रेवती अढाऊ मॅडम ,श्री उमेश म्हसाये सर,पंकजदादा ठेमरे,इत्यदी अकोट येथील नागरिक व तसेच शैक्षणिक विध्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते .सादर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवक्रांती शिक्षण व पदवीधर संघटना यांच्या द्वारे करण्यात आले.
अभिनेता आशिष भटकर सन्मान पत्रांने सन्मानित...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी