भिम जयंती निमित्त रिधोरा येथे ज्यांनी आपले संपूर्ण जिवन देश सेवेत लावले असे माजी सैनिक तसेच आपण ज्या समाजात राहतो त्या प्रती आपलेही सहकार्य असले पाहिजे असे विचार करून काम करणारे समाजिक कार्यकर्ते, यांचे सन्मान चिन्ह देऊन केले सम्मानीत.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दिलीप दंदी वस्ताद हे होते प्रमुख उपस्थिती म्हणून बाळापूर पं स. सभापती रुपालीताई गवई, संजय अघडते सरपंच, गणेश वाडकर उपसरपंचपती , ग्रा.प.सदस्य व वैशाली दंदी ( माजी सरपंच ) , उमा तेलगोटे, राजाभाऊ देशमुख,धर्मेंद्र दंदी, मंगेश गवई,विशाल दंदी, आनंदा दांदळे,अमोल तेलगोटे,हे होते ज्यांचे सत्कार करण्यात आले असे वस्ताद दिलीप बाप्पु दंदी, वस्ताद गुलाबराव जी कीरतकार, माजी सैनिक विलासराव दंदी, दिलीप चेंडाजी दंदी, गणेशराव दंदी, दांदळे साहेब, सुरेश भाऊ इंगळे,महामाया उपासिका संघ, व बाल प्रभोधन कार आदित्य कुमार इंगळे,आविका जामणीक हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी उपसरपंच अनिल दंदी यांनी केले व कार्यक्रम यशस्वी साठी सर्व पंचशिल क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
रिधोरा येथे पंचशिल क्रिडा मंडळातर्फे भिम जयंती साजरी करून माजी सैनिकांचा सत्कार...
प्रतिनिधी / पंकज इंगळे