माती मित्र शेतकरी प्रोड्युसर कंपनी शाखा नांदुरा व उपशाखा खांडवी तसेच जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सात एप्रिल रोजी हरभरा खरेदीचा शुभारंभ खांडवी येथे संपन्न झाला. शेतकरी बांधवांना बाजार भावापेक्षा जास्त भाव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या खरेदीचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी हरभरा खरेदी शुभारंभ करिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक प्रकाशशेठ ढोकणे, एडवोकेट भालेराव, खांडवी चा सरपंच कविताताई उमाळे, झाडेगाव येथील उपसरपंच दशरथ काळंगे, भागवत मुंडे, संतोष मुंडे, गजानन पाटील ,श्रीकांत पाटील, कॉम्प्युटर ऑपरेटर अमोल डोंगरदिवे, शेतकरी विनोद सायखेडे, शत्रुघ्न सुलताने,जहुर पटेल, ज्ञानू ठाकरे यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खांडवी येथे माती मित्र शेतकरी प्रोडूसर कंपनी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हरभरा खरेदीचा शुभारंभ...
जळगांव जा.प्रतिनिधी:-