नांदेड येथील मारवाडी समाजातील एका कर्तुत्ववान व सामाजिक कार्यकर्ते उद्योजक असलेले संजय बियानी यांच्यावर भरदिवसा दोन अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता त्यामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला भर दिवसा एका व्यक्तीवर गोळीबार होतो व तेही खंडणीसाठी हे निंदनीय आहे. या घटनेचा माहेश्वरी संघटन जळगाव जामोद च्या वतीने दिनांक सात एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत या घटकांचा संघटनेने तीव्र निषेध करीत सदर मारेकऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना ताबडतोब पकडावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सदर आशयाचे निवेदन देण्यासाठी डॉक्टर किशोर केला, गोपाल टावरी, मनोज सत्यनारायण राठी, श्याम फाफट, राधेश्याम चांडक, दर्शन राठी, रुपेश कलंत्री, ओमप्रकाश राठी, दर्शन चांडक, पवन टावरी, राम लढ्ढा, सुभाष राठी, अनील टावरी, संतोष केला यांच्यासह माहेश्वरी संघटनेचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नांदेडमध्ये संजय बियाणी यांच्यावर भ्याड हल्ला करून हत्या केल्याच्या निषेधार्थ माहेश्वरी संघटनेची मारेकऱ्याला कठोर कारवाईची मागणी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-