जलंब येथील जलंब जंक्शन रेल्वे रटेशनवर थांबा असलेल्या सर्व गाड्यांचा कोवीड एकोनाविसमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेले थांबे पूर्ववत सुरू करा अन्यथा 8 एप्रिल पासून जलंब रेल्वे रटेशनवर धरणे आंदोलन व रेल रोको आंदोलन करण्यात येईल अशी मागणी सर्व पक्षीय व ग्रामस्थांनी मुंबई मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्या कडे एका निवेदनाव्दारे केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि जलंब जंक्शन रेल्वे रटेशन हे विदर्भातील इंग्रज काळापासून पहिले रेल्वे रटेशन असुन सदर रेल्वे रटेशनवर सर्वच मेल एक्सप्रेस गाड्यांचा थांबा होता परंतु रेल्वे प्रशासनाने कोवीड 19 मुळे दि.23 मार्च 2020 पासून जवळपास दोन वर्षा पासुन सर्व गाड्यांचे थांबे बंद केले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांचे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून प्रचंड हाल होत आहेत. परंतु आता कोवीड 19 चा प्रादुर्भाव राज्यामध्ये पुण॔ पने संपलेला आहे त्यामुळे जलंब रेल्वे रटेशनवर पुर्वी पासून ज्या रेल्वे गाड्यांचा थांबा होता त्या सर्व रेल्वे गाड्या पुव॔वत सुरु करण्यासाठी येथील रेल्वे रटेशनवर दि.8व9 एप्रिल रोजी सर्व पक्षीय व ग्रामस्थांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल सदर मागण्यांची रेल्वे प्रशासनाने पुत॔ता न केल्यास दि.10 एप्रिल रोजी सकाळी 9 रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाव्दारे दिला आहे. सदर आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असे हि निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदनावर असंख्य नागरिकांच्या व सर्व पक्षीय नेत्यांच्या सह्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रति रेल्वे राज्य मंञी रावसाहेब दानवे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, अशोक भाऊ सोनोने, रेल प्रबंधक मध्य रेल भुसावळ, आदींना सुद्धा पाठविले आहेत...
जलंब रेल्वे रटेशनवर कोवीडमुळे बंद झालेल्या रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करा... अन्यथा धरणे आंदोलन व रेल रोको आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा...
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी