आयएनएस विक्रांत या युद्धनौकेप्रति संपूर्ण देशवासीयांची अस्मिता जडलेली आहे. भारतीय नागरिकांच्या व देशातील सैनिकांच्या राष्ट्रीय भावना व जिव्हाळा विक्रांत विषयी जडला आहे. ह्या युद्धनौकेला भंगारात न विकता तिला राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करा. त्यासाठी शासन पैसा देण्यास असमर्थ असेल तर आम्ही लोकवर्गणी करून पैसा गोळा करू, असे आश्वासन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले होते. त्यानंतर गोळा झालेला पैसा राज्यपालांकडे सुकृत करू व पण नंतरच विक्रांतचे स्मारक तयार करावे असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांच्या गॅंग ने रेल्वे स्टेशन, विमानतळ, सार्वजनिक ठिकाणे, नेव्ही नगर व लष्कराच्या वसाहतीमध्ये जाऊन जवळपास शंभर कोटी पर्यंत लोकवर्गणी गोळा केली. ही लोकवर्गणी राज्यपाल कार्यालयालासुपूर्द न करता स्वतः हडप केली. जनतेच्या राष्ट्रीय भावनेशी खेळ करणाऱ्या ह्या सोमय्या ला शासनाने जाब विचारावे व त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिनांक ७ एप्रिल रोजी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिनांक ७ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत दिले आहे.सोमय्या उठ सूट बिनबुडाचे आरोप करीत आहेत, अशा शासनाच्या मंत्र्यांवर बेलगाम आरोप करीत आहेत.सीबीआय आणि ईडीच्या धमक्या देऊन मोठमोठ्या नेते व उद्योगपतींच्या तोड्या करत आहेत. बुलढाणा अर्बन सारख्या लोकप्रिय व मोठ्या संस्थेवर आयकर धाडी टाकून संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला,नंतर एकाच आठवड्याने किरीट सोमय्या यांनी बुलढाणा येथे येऊन सदर संस्थेला भेट दिली व नंतर मात्र संस्थेला क्लिनचीट दिली. हा सर्व प्रकार केंद्र शासनाच्या मार्फत दबाव आणून भ्रष्टाचार करून प्रचंड माया जमविण्याचा प्रकार आहे. असेच प्रकार कित्येक संस्था व नेत्यांविषयी किरीट सोमय्या यांनी केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते,माळी समाजाचे आधारवड मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ही असेच आरोप करून त्यांना विनाकारण तुरुंगात डांबले. नेत्यांचे मंत्र्यांचे चारित्र्यहनन करणाऱ्या आणि आयएनएस विक्रांत च्या माध्यमातून देशद्रोह करणाऱ्या ह्या बोलक्या पोपटाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही तर शिवसैनिक रस्त्यावर येऊन आंदोलन करतील, असा इशाराही या वेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनाला जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, तालुकाप्रमुख व माजी नगराध्यक्ष गजानन वाघ यांचेसह उपतालुका प्रमुख देविदास घोपे,पुंडलिक पाटील,मुश्ताक भाईजान,योगेश पांधी, रमेश हा गे,रमेश ताडे,संजय भुजबळ,पांडुरंग उगले,ज्ञादेव पाटील,गोपाल पाटील,शांताराम धोटे,अशोक टावरी,शुभम पाटील,ईश्वर वाघ,विशाल पाटील,संकेत राहटे, संतोष पाटील,गजानन बाठे,अरुण सोनोने,गणेश धूळे, गजानन दातीर, लक्ष्मण ढगे,शेख शरीफ शेख बफाती,युवराज देशमुख,कार्तिक राऊत, समाधान भगत, सुनील खवले यांच्यासह शिवसेना युवासेना किसान सेनेच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती या सर्व उपस्थित शिवसैनिकांनी यावेळी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली .
किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा जळगांव जामोद तालुका शिवसेनेने केले मागणी...
जळगाव जा.प्रतिनिधी:-