हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव बु येथे दिनांक २९ एप्रिलच्या संध्याकाळी आकोला अन्नपुरवठा विभागाने गोपनीय माहितीद्वारे गुटखा विक्रेत्यांस धाड टाकून एकास ताब्यात घेतले तर दोन फरार होण्यास यशस्वी झाले, आरोपी विक्रेता अनिल पेरळकर वय ३२ वर्षे रा आकोट तर फरार झालेंले गुटखा माफीये मुसा उर्फ अब्दुल मुसदीक अब्दुल नजीक, अस्लमखा सनउल्लाखा रा, दोन्ही अडगाव बु ,येथील रहिवासी असून फरार होण्यास यशस्वी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे, रंगेहात पकडलेल्या आरोपी जवळ सुगंधित तंबाखू, वाह, निळे, पाकीट असा ऐकून १५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, आरोपी विरुद्ध कलम १८८,२७२,२७३,३२८,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ,ही कारवाई अन्न औषध प्रशासन अधिकारी नितीन नवलकार सहाय्यक उपयुक्त यांनी केली असून आरोपी हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला, तर पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत असून फरार झालेले आरोपी जेरबंद होतील किंवा फरारच राहतील या कारवाईने लक्ष वेधले आहे,
आकोला अन्नपुरवठा विभाग व औषध प्रशासनाची गुटखा विक्रेत्यांवर कारवाई,मात्र अडगाव येथील मुख्य आरोपी फरार,
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
