महात्मा फुले जयंतीदिनी सुनगाव येथील शाळा व्यवस्थापन समिती गठीत...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक 11 एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनी सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेची नूतन शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. सर्वप्रथम जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, माजी पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, पोलीस पाटील मनीषा तडवी, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सोनटक्के ताई, शाळेचे मुख्याध्यापक ताडे, पोलीस नाईक अनिल सुशिर, पत्रकार अनिल भगत, ग्रामपंचायत सदस्य गजानन दातीर, सौ कुरवाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई, यांची मंचकावर उपस्थिती होती. यावेळी महात्मा फुले यांची जयंती साजरी करून नवीन शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारणी वर्ग 1 ते 8 मधून निवडण्यात आली. ही कार्यकारणी निवडीची शांततेत प्रक्रिया पार पडली. या सर्वांमधून बिनविरोध शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनगाव येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल खवले यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी विनोद अंबडकार यांची ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली. तर सदस्यपदी संतोष काळपांडे, शारदा वानखडे, प्रमिला पवार, समाधान भगत, रेखा तायडे, अमर तडवी, ज्योती देशमुख, अबिदा तडवी, विजया मुर्हेकर, शरीफ तडवी या सर्व सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन संदीप सारोकार यांनी केले तर आभार प्रदर्शन निकम सर यांनी केले. यावेळी शाळेचे शिक्षक विजय बुटे, सुप्रिया बोंबटकार,अस्मिता क्षिरसागर, संध्या उमाळे, योगेश सहावे, वर्षा राजगुरे, ज्योती साबे, सुनिता खर्डे, शिल्पा गवई यांनी विशेष सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वितेकरिता मनोहर वानखडे, राजू अंदुरकार यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची शाळा व्यवस्थापन समिती निवडीकरिता उपस्थिती होती.

Previous Post Next Post