जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळेत दिनांक अकरा एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून त्यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त करून जयंतीदिनी अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीलादेवी मानकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख उपस्थिती मध्ये सरपंच सौ शीतल वानखडे, सौ दिपाली भगत उपसरपंच, केंद्रप्रमुख योगेश वाघ शोभा गोमासे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शोभा गोमासे मॅडम यांनी शाळेला फोटो फ्रेम आणि लोखंडी कपाट सप्रेम भेट दिले. कार्यक्रमासाठी वकील खा, समाधान मानकर, दिनेश भड, पंकज उमरकर शाळेचे मुख्याध्यापक सोळंके सर यासह शाळेचे सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
वडशिंगी येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-