जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे दुपारी तीन ते चारच्या दरम्यान मंगेश नंदाने वय 42 वर्ष या इसमाच्या गोठ्याला अचानक आग लागली असता, त्या आगीमध्ये एक गाय व एक वासरु जळुन मृत्यू पावले तसेच त्यामध्ये गाय जखमी अवस्थेत बाहेर पडून गेली. गोठ्याला आग एवढी भीषण होती की त्यामध्ये चार एकर ठिंबक संच व 50 पिव्हिसी पाईप जळून खाक झाले. तसेच गुरांचा चारासुध्दा जळुन खाक झाला असुन त्या आगीमध्ये मंगेश नदाणे यांचे अंदाजे 82 हजाराचे नुकसान झाले तसेच शेजारील विष्णू अकोलकर यांच्या घराला सुद्धा आगीने चपेटीत घेतले होते त्यांचं अंदाजे 36 हजाराचे नुकसान झाले तसेच त्या शेजारी असलेल्या ज्योती अनोकार यांच्या घराला सुद्धा या आगीमुळे नुकसान झाले व त्यांचे सुद्धा जवळपास अंदाजे 83 हजाराचे नुकसान झाले. जळगाव जामोद येथील अग्निशामक दलाने येऊन वेळीच आग आटोक्यात आणली तसेच गावातील मंडळींनी सुद्धा धावून आग विझविण्याचा प्रयत्न केला व आग विजवली, महसूल विभागातर्फे मंडळ अधिकारी चोपडे साहेब व त्यांचे सहकारी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व पोलीस प्रशासनाने हजर राहून परिस्थिती वर नियंत्रण ठेवले..
जामोद येथे गोठ्याला आग लागून दोन जनावरे दगावली लाखोचे नुकसान...
जळगांव जा.प्रतिनिधी:-