पूर्व माध्यमिक शाळा अंबाडी येथे शाळापूर्व तैयारी मोठया उत्साहाने साजरा..


धारणी तालुका प्रतींनिधी :- सुंदर पोटेकर,

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळामध्ये शाळेपूर्व तैयारीचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पूर्व मा. शाळा अंबाडी येथे शाळापूर्व तैयारीचे आयोजन मोठ्या उत्साहाने मुख्याध्यापक श्री. आनंद धांडे सर यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला. गावात प्रभातफेरी काढून व संस्कृतिक कार्यक्रम घेऊन शिक्षणाबद्दल सर्वांना जागरूक करण्यात आला. सदर कार्यक्रमाला संबोधित करतांना अंबाडी येथील पो. पाटील श्री. चंद्रसेन नांदुरकर यांनी शाळापूर्व तैयारीचे उद्देश सांगताना म्हटले की, शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे व चांगल्या पद्धतीने शिक्षण घेवून सर्वोच्च पदावर पोहचावे. पहिल्या वर्गात प्रवेश घेणार्‍या मुलां-मुलींना प्ररीत करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. आनंद धांडे सर, श्री. ओमप्रकाश सेठमणिक सर, श्री. मनोज देशमुख सर, श्री. सुनिल मालविय सर, श्री. अशोक जावरकर सर, पो.पाटील श्री. चंद्रसेन नांदुरकर, अंगणवाडी सेविका सौ. सुंदरताई मावस्कर व सर्व गावकरी, नागरीक उपस्थित होते.

Previous Post Next Post