आज दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा राणीतंबोली येथे शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम गावात मिरवणूक काढण्यात आली. या मेळाव्यामध्ये पुढील सत्रात इयत्ता पहिली मध्ये येणारे दाखल पात्र विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्वागत करण्यात आले व त्यांना शिक्षणा विषयी गोडी निर्माण व्हावी अशा संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतर्फे सात स्टॉल लावण्यात आले होते प्रत्येक स्टॉलवर पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आनंददायी पद्धतीने मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीतून त्यांना शाळा विषयी गोडी निर्माण व्हावी हाच आजच्या मेळाव्याचे प्रमुख उद्देश मानले जाईल.मागील दोन वर्षापासून कोरोना ने देशाला शैक्षणिक बाबतीत बऱ्याच प्रमाणात मागे टाकले आहे, त्या अनुषंगाने दाखल पात्र विद्यार्थ्यांची बौद्धिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक क्षमता आणि भाषा विकास या सर्व संबंधी त्याची पातळी बघण्याकरिता हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा होत आहेत.राणीतंबोली गावातील सर्व दाखल पात्र विद्यार्थी आपल्या पालकांसोबत या मेळाव्यात उपस्थित होते. या शाळापूर्व तयारी मेळाव्यात जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा राणीतंबोली चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजू यादव सह शाळेचे मुख्याध्यापक गजानन मुंडे, विषय शिक्षक शैलेश चौकसे, सहाय्यक शिक्षक विनायक मावस्कर, पंचफुला मुंडे, अर्पणा बैलमारे आणि गावकरी उपस्थित होते.
राणीतंबोली येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न...
धारणी ता.प्रतिनिधी:-सुंदर पोटेकर.