तेज मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व ऑल इंडिया जैन कॉन्फ्रेंस युवा शाखे चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व अंतरराष्ट्रीय युवा भूषण समाजसेवी तेजस प्रकाशचंद झांबड यांचे पुढाकराने भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त शारीरिक तपासणी शिबीर नॅशनल शाळेच्या विद्यार्थी साठी आयोजित करण्यात आले होते तसेच या शिबीर ची सुरवात भगवान महावीर यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण व पुष्प अर्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले त्यात प्रमुख उपस्तीथी शाळे च्या प्राचार्य प्रविणा शाह मॅडम व तेजस प्रकाशचंद झांबड यांची होती.या शिबीर ला खामगाव येथील सुप्रसिद डॉक्टरांचं समुह डॉ प्रदीप राठी व डॉ गौरव लड्डा बाळरोग तज्ञ,डॉ नितेश मेघवाणी व डॉ श्रुती लड्डा नेत्र तज्ञ तसेच डॉ दित्या मेघवाणी दंतरोग तज्ञ या सर्व डॉक्टरांनी शंबर हुन अधिक विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी केली व योग सल्ला दिली व विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रतिसात मिळाले व हे शिबीर आयोजित केल्याने तेजस झांबड यांना प्राचार्य प्रविणा शाह मॅडम यांनी शाळे तर्फे प्रशंसा पत्र देऊन गौरविन्यात आले व तेज फाउंडेशनच्या वतीने सर्व डॉक्टरांना व नैशनल शाळे ला आभार पत्र देण्यात आले व सूत्र संचालन गहवांदे सरांनी केले व शिबीर यशस्वी संपन्न झाले.
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त तेज फाउंडेशन व जैन कॉन्फ्रेंस यांचा संयुक्त विध्यमाने शारीरिक तपासणी शिबीर संपन्न...
प्रतिनिधी/अनिल भगत.