चिखलदरा तालुक्यातील चांदपूर या शेतशिवारातिल एका नाल्याच्या ठिकाणी करोडो रुपयाचे मातीचे धरणाचे काम सुरू असुन या कामावर एकही शासकीय अधिकारी नसुन या धरणाच्या कामावर कंत्राटदार आपली मनमानी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील मातीच्या कामावर पाणी नसून या मातीच्या कामावर कशाही प्रकारचे दबाई होत नसल्याचे दिसून येत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या धरणाचे काम दिवसा न करता रात्रीच्या वेळेला या धरणावर माती टाकली जात आहे. तसेच हा धरण पावसाळ्यात पाण्याने भरत गेल्यास कधी ही पण धरण फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या कामात शासकीय अधिकारी व कंत्राटदार खुप मोठ्या प्रमाणात मलिदा खात आहे असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. येथिल कंत्राटदार व शासकीय अधिकाऱ्यांला दुरध्वनी व्दारे संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.
----------------------------------------
हे धरणाचे काम पुष्कळ दिवसा पासुन सुरु आहे. येथिल मातीच्या कामावर पाणी काहीच टाकला जात नाही. तसेच दबाई करण्यासाठी जे रोड रोलर आणले आहे. हे फक्त शोभेची वस्तू दिसत आहे . तसेच मि येथिल कामावर असलेले व्यक्तींना विचारले या कामावर ठेकेदार व शासकीय अधिकारी कर्मचारी येत नाही का? त्यांनी उत्तर दिले या कामावर कोनीही येत नाही. असे उत्तर येथिल कामावर असणारे व्यक्तींचे आहे. तसेच पिचिंग च्या कामात जे दगड वापरले जातात ते दगड येथे दिसत नाही. या कामात खरोखरच खुप मोठा भष्टांचार होत आहे असे मला दिसुन येत आहे. त्या करीता या धरणाच्या कामाची तक्रार मि जिल्हा पातळीवर लवकरच करणार आहे.
लालजी दहीकर
सरपंच (टेबुरसोंडा /चांदपूर)
