तालुका जळगाव जामोद येथील पिंपळगाव काळे येथे काँग्रेसचे माजि जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील यांच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन दिनांक.२९/४/२०२२ शुक्रवार रोजी करण्यात आले होते.व ते संपन्न पण झाले. पिंपळगाव काळे परिसरातील महाराणा प्रताप सभागृह येथे सामाजिक सलोखा राखत इफ्तार पार्टीचे आयोजन करत सामाजिक संदेश दिला.पिंपळगाव काळे परिसरात दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. हनुमान जयंती. ईद-ए-मिलाद या सह विविध सण उत्सव सर्वांच्या सहभागातून उत्साहात साजरे केले जातात. पिंपळगाव काळे येथे एकता आणि बंधुता टिकवून सर्वजण एकमेकांच्या कार्यक्रमात हीरीरीने सहभागी होतात. त्याच पद्धतीने सलोखा राखत पिंपळगाव काळे काँग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करून मुस्लिम बांधवांना भजे व शिऱ्याची इफ्तार पार्टी देण्यात आली.अशाप्रकारे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते व ते संपन्न झाले.यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळगाव काळे येथे काँग्रेसच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन व संपन्न...
मंगल काकडे/पिंपळगाव काळे प्रतिनिधी..
