जळगांव जा.प्रतिनिधी:-
दरवर्षीप्रमाने 09 मे 2022 रोजी येऊ घातलेल्या हिन्दुसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त दि.20 एप्रिल 2022 रोजी स्थानिक शासकीय विश्राम गृह येथे राजपूत समाज बांधवांची नियोजन मिटिंग सम्पन्न झाली.या मिटिंग मध्ये तालुक्यातील जळगाव जा, पिंपळगाव काळे, सुनगाव, काजेगाव, आसलगाव, पळशी सुपो,करणवाडी तसेच पळशी वैद्य येथील समाजबांधव उपस्थित होते. तसेच समाजातील वरिष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली समिती गठीत करण्यात आली.या कार्यकारिणी मध्ये सर्वानुमते मयूर रामसिंग खंडाळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्षपदी गजानन मोरे, दीपक राजपूत, विशाल चव्हाण,रतन राजपूत यांची निवड करण्यात आली तसेच सचिवपदी परमानंद राजपूत सहसचिव किरण ठाकूर कोषाध्यक्ष सुनिल ठाकूर सहकोषाध्यक्ष शैलेश राजपूत प्रसिद्धी प्रमुख अश्विन राजपूत सल्लागार समिती मध्ये डॉ.प्रशांतसिंह राजपूत,अजयसिंह राजपूत,सुनिल रघुवंशी,ऍड.स्वप्नील राजपूत, कैलाससिंह राजपूत, जाधव सर,रघुवंशी सर, सोळंके सर, भगतसिंह चव्हाण, राजू पाटील, देवेंद्र सोमवंशी, विनोद पवार,गणेश ठाकूर,दरबारसिंह राजपूत व सर्व समाज बांधव उपस्थित होते...