शेगाव येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र वझेगाव येथे परमहंस श्री रामचंद्र महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीरामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन १० एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत करण्यात आले आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तसेच शासनाच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे श्रींचा जन्मोत्सव सोहळा अंतर्गत व मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. परंतु आता शासनाकडून निर्बंध उठविण्यात आले असून श्रीरामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत श्रीक्षेत्र वझेगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण हभप भानुदास महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून होईल. दैनंदिन कार्यक्रमात सकाळी काकडा ५ ते ६, परायण ९ ते १२ व ३ ते ५ हरिपाठ ५ ते ६, हरि किर्तन रात्री ८ ते १० राहील. १० एप्रिल रोजी श्रींचा जन्मोत्सव पाळणा व आरती दुपारी १२ वाजता होईल. तर १६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीला दुपारी ४ वाजता रथातून श्रींची प्रतिमा, पादुका, पालखीतसह टाळ, मृदुनगाच्या गजरात नगर प्रदक्षिणेसाठी निघेल. श्रींच्या रथाचे पूजन बाळापूर मतदारसंघाचे आ.नितीनबाप्पू देशमुख यांच्या हस्ते राहील. तर १३ एप्रिल रोजी विठ्ठल रुख्मिनी पूजा सुनील वानखडे यांच्या हस्ते होईल. होमहवन व महाप्रसाद १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वा. सुरू राहील. यावेळी १० एप्रिल पासून १६ एप्रिल पर्यंत अनुक्रमे भानुदास महाराज, अमोल महाराज घुगे, अमोल महाराज गाडगे, केशव महाराज मोरे, सारंगधर महाराज, निवृत्ती महाराज, तुकाराम महाराज यांची किर्तन रुपी सेवा राहील. गायनाचार्य हभप विनोद महाराज पवार, हभप जगदिश महाराज कडाळे, मृदुनगचार्य हभप अनंता महाराज केंद्रे राहणार असून पंचक्रोशीतील गायक व टाळकरी राहतील तरी सर्व भाविक भक्तांनी उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे
श्रीक्षेत्र वझेगाव येथे श्रींचा जन्मोत्सव सोहळा...श्रीरामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख.