अमरावती जिल्हातिल वरुड शहरातील मुलताई चौकात शनिवार दि. 23 रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश बाबाराव घारड यांच्यावर दुचाकीस्वार आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळून गेल्याची घटना घडली असुन गोळी घारड यांच्या मांडीत लागल्यामुळे ते गभिंर जखमी झाले आहेत. त्यांना समोर उपचारासाठी नागपूर रेफर करण्यात आले आहे. या घटनेने वरुड शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांपैकी एकाचे नाव निष्पन्न झाले असुन, राहुल राजु तडस असे हल्लेखोरांचे नाव असल्याचे वरुड पोलिसांनी सांगितले आहे. योगेस घारड हे शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास वरुड शहरातील मुलताई चौकातून दुचाकीने जात होते. याचवेळी त्यांच्या मागून एका दुचाकीवर राहुल तडस व अन्य एक जन आला. त्या दोघांपैकी एकाने योगेश घारड यांच्यावर गोळीबार केला. यावेळी ही गोळी घारड यांच्या मांडीमध्ये लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरुड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी मुलताई चौकात धाव घेतली.
अमरावती शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गोळीबार:माडीत गोळी लागल्यामुळे ते गभिंर जखमी...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी