दिनांक 28 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीतील रोहिणखेड येथील विजय नारायण सुरपाटणे हे कोराळा बाजार येथून रोहिणखेड येथे त्यांचे दुकान बंद करून दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने घरी घेऊन येत असताना संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास लाल माती फाट्याजवळ चाकूचा धाक दाखवून फिर्यादीस मारहाण करून त्याचे ताब्यातील बॅगमध्ये असलेल्या सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असा एकूण तीन लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्यावरून पोलीस स्टेशन धामणगाव बढे येथे तक्रार देण्यात आली होती. त्यावरून अपराध नंबर 81/2022 कलम 394,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलिस निरीक्षक बळीराम गीते यांनी दिलेल्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच पोलिस स्टेशन धामणगाव बढे येथील तपास पथकाने घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करुन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुप्त माहितीच्या आधारे पोलिस स्टेशन धाड अंतर्गत येत असलेल्या ग्राम जनुना येथील राजेंद्र सुपडा चंडोल व जालना जिल्ह्यातील ग्राम वालसावंगी येथील कृष्णा नारायण मुरुडकर या दोघांना ताब्यात घेतले त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत एकूण सात आरोपींची माहिती दिली गुन्हा करण्यापूर्वी फिर्यादी हा सोनार असल्याने त्याची जाण्या-येण्याची पूर्ण रेकी करून सदर कट रचल्याचे त्यांनी सांगितले त्यानुसार त्यांनी सदर फिर्यादी याला रस्त्यामध्ये मोटरसायकलने सोन्या चांदीचे दागिने घेऊन जाताना एकटे गाठून डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला लुटल्याचे त्यांनी सांगितले सदर गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपींची नावे नावे पुढील प्रमाणे कृष्णा नारायण मुरुडकर राहणार वालसावंगी तालुका भोकरदन जिल्हा जालना, ताराचंद तुळशीराम कचरे राहणार नांदलगाव जिल्हा औरंगाबाद, सुरेश गजानन झालटे राहणार बोरखेड जिल्हा बुलढाणा, विशाल संतोष वाघ राहणार कोर्हाळा बाजार तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा, मुकेश ओंकार बस्सी राहणार तरोडा तालुका मोताळा, स्वप्निल विष्णू गवळी राहणार वालसावंगी जिल्हा जालना, राजेंद्र चोपडा चंडोल राहणार जनुना जिल्हा बुलढाणा या सर्व आरोपींना दिनांक 27 एप्रिल पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस स्टेशन धामणगाव बढे येथील ठाणेदार चंद्रकांत ममताबे करीत आहेत तर आरोपी जवळून दिनांक 25 एप्रिल रोजी चांदीचे दागिने 3304.83, सोन्याचे दागिने 33.89 असा एकूण अंदाजे चार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपींपैकी तीन सराईत आरोपी असून त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी ताराचंद कचरे वय 32 याच्यावर 1 खुन,4 दरोडे, जबरी चोरी 17 गुन्हे, चोरीचे 4 गुन्हे असे एकूण 26 गुन्हे दाखल आहेत तर राजेंद्र चंडोल राहणार जनुना याच्यावर घरफोडी चे 2 गुन्हे, चोरीचे 3 गुन्हे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत, तर कृष्णा मुरुडकर राहणार वालसावंगी तालुका भोकरदन जिल्हा जालना याच्यावर जबरी चोरी 1 गुन्हा, चोरीचे 2 गुन्हे व इतर शरीरा विरुद्धचे व मालमत्तेचे दोन गुन्हे आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित वानखडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत ममताबे, पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक आशिष गंद्रे,ए,एस,आय मधुकर महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील, विजय वारुळे,जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम अघाव, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले, गणेश शेळके, वैभव मगर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश सोनुने, शरद बाठे, पोलीस कॉन्स्टेबल सुरज रोकडे,धीरज चंदन, राजु आडवे,दामोधर लढाळ, महिला कॉन्स्टेबल सरिता वाकोडे, चालक शिवानंद मुंढे,सचिन जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली...
दरोडा व जबरी चोरी करणारी सराईत आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात...
बुलढाणा जिल्हा विशेष/अनिल भगत..
