जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये येत असलेल्या पिंपळगाव काळे येथील शिव नगरांमधील 26 वर्षीय तरुणाचा कुर्हाडीने अंगावर व पाठीवर वार करीत गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना दिनांक तीन मे रोजी घडली आहे याबाबत त्याचा भाऊ अजय किसन राऊत यांने जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला येऊन फिर्याद दिली की पिंपळगाव काळे येथील मृतक माझा भाऊ सुपेश किसन राऊत वय 26 वर्षे हा आमच्या परिवारासह शिवनगर मध्ये राहत असल्याने आरोपी यांने सुपेश सोबत तू शेतात जाता-येता आमच्या घराकडे का पाहतो या कारणावरून दिनांक 3 मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वाद घातला असता आरोपी किसन रमेश वरणकार, गणेश किसन वरणकार अजय किसन वरणकार व हरिदास रमेश वरणकार यांनी संगनमत करून सुपेश याला लाथाबुक्क्यांनी व नंतर कुर्हाडीने पाठीवर व डोक्यावर वार करीत त्याला गंभीर रित्या जखमी केले होते. गंभीर अवस्थेमध्ये जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सुपेश याच्यावर उपचार चालू असतानाच तो गंभीर जखमी असल्याकारणाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी फिर्याद जळगाव जामोद पोलीस स्टेशनला देण्यात आली असता जळगाव जामोद पोलिसांनी अपराध नंबर 250/2022 कलम 302 नुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करीत घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला व त्यामधील तीन आरोपींना पोलिसांनी अटक करून कोर्टासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसीय पोलीस कोठडी मिळाली तर त्यापैकी एक आरोपी घटनेमध्ये जखमी झाला असता त्याला उपचारार्थ भरती करण्यात आली असून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे करीत आहेत.
पिंपळगाव येथील 26 वर्षीय तरुणाचा कुर्हाडीने वार करून खून.आरोपी अटकेत..
 जळगांव जा.प्रतिनिधी:-
 
