चिखलदरा तालुक्यातील अंतर्गत येणारा गाव चांदपूर या गावाच्या शेतशिवारात एका साठवण तलावाचे काम १९आगष्ट२०१४ वर्षा पासुन आमदार प्रभुदासजी भिलावेकर यांचे हस्ते करण्यात आले होते. परंतु या साठवण तलावाचे काम काही कारणास्तव धिमीगतिने सुरू होते. या कामाबद्दल पत्रकार राजु भास्करे यांना माहीती मिळताच यांनी चांदपूर येथिल साठवण तलावाची पुर्ण पणे माहीती घेऊन या कामाबद्दल वृत्त पेपर व न्युज चॅनेल वर बातम्या प्रकाशित केल्या होत्या या बातमीची दखल घेऊन मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी या कामावर दि. ५/५/२०२२ रोजी ठिक चार वाजता भेट दिली असता येथील डेप्युटी इंजिनिअर ढोंडे व कंत्राटदार इगळे यांना साठवण तलावाचे काम चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे असे आदेश दिले आहे. तसेच या कामावर आमदार राजकुमार पटेल यांनी भेट दिली असता सर्व काम व्यवस्थित पाहण्यास आमदार राजकुमार पटेल यांना मिळाले आहे.या साठवण तलावाचे कामाची पाहणी करण्याकरिता आमदार राजकुमार पटेल, डेप्युटी इंजिनिअर मोहनी ढोंडे, शाखा अभियंता आकाश इंगळे, छोटू भाऊ तेलगोटे, सामाजिक कार्यकर्ते रामजी सावलकर, व गावातील नागरिक उपस्थित होते.
----------------------------------------
चांदपूर व टेबुरसोंडा येथिल शेतकऱ्यांचे शेती या साठवण तलावात गेली आहे. परंतु आज पर्यंत या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला मिळाले नसुन लवकरच येथिल शेतकऱ्यांचा मोबदला आठ दिवसांत मिळणार आहे. तसेच या साठवण तलावाचे काम चांगल्या प्रकारे सुरू असुन येणाऱ्या पावसाळया पर्यंत हे काम पुर्ण करण्याचे व या वर्षी पाणी साठा झाला पाहिजे असे आदेश जलसंधारण विभाग व कंत्राटदार यांना दिले आहे.
राजकुमार पटेल
आमदार(मेळघाट)
----------------------------------------
येथिल तलावाच्या कामात मि कशालाही प्रकारेची भष्टांचारी खपवून घेणार नाही. व हे काम चांगल्या प्रकारे झाले पाहिजे हेच माझे उद्देश आहे. व हे काम येथिल कंत्राटदारा पासून चांगले करुन घेणार
मोहीनी ढोंडे
डेप्युटी इंजिनिअर चांदूर बाजार
---------------------------------------येथिल साठवण तलावाचे काम काही निधीअभावी काही वर्षे रखडले होते. परंतु निधी प्राप्त होताच या तलावाचे काम ८० टक्के पुर्ण झाले आहे. येणाऱ्या पावसाळ्या पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल.
हरिश्चन्द्र इंगळे
कंत्राटदार
