राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीत येणारा गाव
कुटुंगा येथे टायगर झोन मध्ये वीस वर्षा पासून कार्यरत असलेले जाजू बाटु बेठेकर (वय ४० वर्ष) राहणार सेमाडोह या विवाहित मजुराचा मृतदेह कुटुंगा येथे असलेल्या आश्रम शाळे जवळ एका शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेह हा उष्माघाताने झाला की घातपात आहे.अशी शंका नागरिकांन मध्ये जोर धरत आहे. जाजु बेटेकर हा वीस वर्षा पासून टायगर रिझर्व झोनमध्ये कार्यरत होता अशी माहिती मिळाली या परिसरात या आश्रम शाळे जवळ हा दुसरा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हे प्रेत पाहण्या साठी नागरिकांनी एकच मोठी गर्दी केली होती. फॉरेस्ट कर्मचाऱ्यांसोबत अजून संपर्क होऊ शकला नाही परंतु तेथील वन शिपाई आढळून आले याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास चालू होता जाजु बेठेकर यांच्या नात्यावाईक सोबत संपर्क केला असता आम्ही सेमाडोह येथून निघालो आहो असे त्यांनी सांगितले सेमाडोह येथे नातेवाईकांमध्ये मृत्यूची बातमी ऐकताच हळ हळीचे वातावरण बघावयास मिळाले.
