राजू भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी तालुका मुख्यालयापासून पंचवीस की मी अंतरावर अस्लरल्या गुगामाल वन्यजीव विभागातील ढाकना परीक्षेत्रात अनेकांना वाघोबाचे दर्शन झाले आहे. गेल्या तीन चार दिवसापासून तापमाना मध्ये प्रचंड वाढ झाल्याने व जंगलात आगीने रौद्र रूप धारण केल्याने जंगलमध्ये प्रचंड तापमान वाढले आहे त्यामुळे जंगली प्राणी सैरावैरा पळत आहे. आणि त्याबरोबर जंगलाचा राजा वाघ सुद्धा घनदाट जंगल सोडून गावाच्या जवळगडगा नदीच्या काठी असलेल्या परिसरात वास्तव्यास असल्याचे ढाकणा सावऱ्या व आढाव येथील अनेकांनी पहिले.गडगा मध्ये पाणी पिऊन जंगलाच्या दिशेने जाताना अनेक लोकांनी पहिले.दरवर्ष्याच्या तुलनेत यावर्षी जंगलात जास्त आग लागत असल्याने ही परिस्थिती पहायला मिळत आहे.वेळीच व्याघ्र प्रकल्पाने दखल घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आहे.
