गाळमुक्त तलाव मोहिमेचा उबारखेड येथे शुभारंभ...

तेल्हारा विशेष प्रतिनिधी/संघपाल गवारगुरु..

तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे मूदू व जलसंधारण पाटबंधारे विभागाचे गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार  मोहिमेअंतर्गत तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण उबारखेड शेत शिवारात असलेल्या गाव तलावातील गाळ उपसा करण्याचा शुभारंभ उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांच्या हस्ते ता .९ मे रोजी करण्यात आला. गाव तलावातील गाळ उपसा करून गाळमुक्त धरण, तलाव करण्याचा शासनाचा मानस आहे.तलावातील गाळ उपसा करणे हे शेतक-यांच्या हिताचे असुन,शेत जमीनीला नवी संजीवनी देणारा असल्यामुळे शेतीची पोत सुधारनारा आवश्यक गाळ शेतकरयांना उपलब्ध होईलच,शिवाय तलावातील गाळ निघाल्याने तलावात भरपूर पाणी थांबले व परिसरातील भुजलाची पातळी सुधारण्यास मदत होणार असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी यावेळी सांगितले.उपसंरपंच अणिल भाकरे, सुमेध गवारगुरु, शेख यासीन शेख मन्नान,धमैश चौधरी, सदस्य जाफर खा, दिनेश गवार गुरु,तलाठी डोंगरे,कुषी सहाय उमेश डांगे, मधुकर कोगदे, सचिन चोपडे,उबाळे,रविण गवारगुरु,पवन गवारगुरु यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post