मागील ७, ८ तारखेला अमरावती जिल्हा च्या पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांचा दौरा मेळघाट क्षेत्रातील बरेच गावाच्या ठिकाणी झाला आहे. या दौऱ्या दरम्यान पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांना मेळघाटातील रस्ते खंड्यात कि खड्यांत रस्ता असे पालकमंत्र्यांचा निर्देशात आले आहे.त्याच प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह ते रायपूर, हतरू हा रस्ता एकदम शिकस्त दर्जाचे झाले असुन या रस्त्यावर अमरावती जिल्हा च्या पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांना व ताफ्यातील नेते मंडळींना तारेवरची कसरत करावी लागली आहे.हतरू ते सेमाडोह हा रस्ता जवळपास चाळीस किलोमीटर असुन हा रस्ता पुर्ण पणे उखडलेले आहे. तसेच सेमाडोह ते हतरू जाण्यासाठी वाहन चालवताना येथिल चालकांना कमित कमि दोन ते तिन तास लागत असल्याचे बोलले जात आहे. सेमाडोह ते हतरू या रस्ताची दखल शासनाने नाही घेतल्यास परतवाडा कडे येणाऱ्या रुग्णांना किवा गर्भवती महिलेला त्यांचा रस्तावरच जिवाचे बरे वाईट होण्याची संभावना नाकरता येणार नाही.
पालकमंत्र्यांचा ताफा गेला धुळखात...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
